
अहमदनगर (दि.२७ ऑक्टोबर):-नाशिक पुणे महामार्गावर वाहनचालकाचा पाठलाग करुन जबरी चोरी करणारे ०२ सराईल आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी नामे राजकुमार श्रीरंग भालके (रा.माळवाडी,वारजे,अमरभारत सोसायटी पुणे) हे तसेच साक्षीदार असे त्यांचे कडील तीन चाकी रिक्षा घेवुन शिर्डी ते पुणे जात असतांना नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कजुर्ल पठार गावचे शिवारात काळभैरवनाथ मंगलकार्यालयाचे समोर इटिंगा गाडीमधुन आलेल्या अनोळखी इसमांनी फिर्यादीची रिक्षा अडवुन त्यांचे हातातील कोयत्याने रिक्षाची काच फोडुन तसेच फिर्यादी यास कोयत्याने जबर मारहाण करुन १,३५,०००/- रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेलेली होती.या बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ५०४/२०२३ भादवि कलम ३९४,५०४,५०६ प्रमाणे अनोळखी ०३ ते ०४ इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक यांनी पोनि/श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील यांचे पथक तयार करुन पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा ठिकाणी भेट देवून नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचे लगत असलेले हॉटेल,धाबे, टोलनाके यावरील सी.सी.टी.व्ही.फुटेज चेक करुन आरोपींची माहिती काढत असतांना पोनि श्री.आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे संजय सुदाम मोरे रा. कोपरगांव याने व त्याचे इतर साथीदारांनी सदरचा गुन्हा केला असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने पथकास सदर इसमाचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. पथकाने कोपरगांव या ठिकाणी जावुन इसम नामे १) संजय सुदाम मोरे रा. रामवाडी,संवत्सर,कोपरगांव याचा शोध घेवुन तो मिळुन आल्याने त्यास विश्वासात घेवुन गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने तसेच त्याचे इतर साथीदार नामे २)आशिष उर्फ काल्या राममिलन कोहरी रा. पुणतांबा चौफुली, कोकमठाण,ता.कोपरगांव, ३)करण सुदाम मोरे रा.रामवाडी, संवत्सर, कोपरगांव (फरार) व करण मोरे याचे दोन अनोळखी साथीदार अशांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. वरील पैकी अ. नं. ०१ व ०२ हे मिळुन आलेले असुन त्यांचे कडुन गुन्ह्यात वापरलेली इटींगा गाडी क्रमांक एम.एच.०६,बी.एम. २३३९ तसेच रोख रक्कम असा एकुण ५,६५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळुन आलेल्या आलेल्या इसमांना पुढील कार्यवाहीकामी घारगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास घारगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर मॅडम,उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सोपान गोरे, पोहेकॉ/विजय वेठेकर,अतुल लोटके,पोना/रविंद्र कर्डिले, संतोष खैरे,फुरकान शेख,पोकॉ/रणजीत जाधव,रोहित येमुल,किशोर शिरसाठ,सागर ससाणे,अमोल कोतकर, अमृत आढाव यांनी केली आहे.