
अहमदनगर (दि.२७ ऑक्टोबर):-चोरीला गेलेल्या दिड लाख रुपये किंमतीच्या पाच मोटारसायकल कोतवाली पोलीसांनी तक्रारदारांना परत केल्या आहेत.

यापूर्वीही कोतवाली पोलीसांनी चोरीला गेलेल्या व पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या मोटारसायकल मूळ मालकांना परत केल्या आहेत.
मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पथकाची नेमणूक केली असून मोटारसायकल चोरांचा शोध सुरु आहे.सनीत सुभाष खेत्रे (रा. वाहेगाव ता. गेवराई, जि. बीड, हल्ली रा. संभाजी कॉलनी रेल्वे स्टेशन अहमदनगर) या आरोपीचा बीड पोलिसांच्या मदतीने शोध घेऊन त्याच्याकडून एक लाख ५० हजार रुपये किंमतीच्या पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरीला गेलेल्या पाच गुन्ह्यातील तक्रारदारांना त्यांच्या मालकीच्या मोटारसायकल देण्यात आल्या आहेत. विनायक दिनकर कुलकर्णी (रा. शनीमंदिराजवळ अहमदनगर), अशोक भाऊसाहेब रासकर (रा शिवाजी चौक केडगाव), बिभीषन समशेर सिंग (रा.सक्कर चौक अहमदनगर), भगवान गोजेबाराव वाघमारे (रा.पाईप लाईन रोड, अहमदनगर), किशोर तानाजी रावडे (रा.शाहू नगर केडगाव) यांना मोटारसायकल देण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, पोहेकॉ/राजेंद्र अशोक औटी, वसंत सोनवणे,मपोहेकॉ/ कल्पना आरवडे,गोरक्ष काळे, संदीप साठे यांनी ही कारवाई केली आहे.