
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-गेल्या ४६ वर्षापासून ज्या ठेकेदारांनी भोजापुर चारीचे कामे न करता चारीचा निधी गिळंकृत केला त्या संबंधित सर्वच ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी तळेगाव दिघे येथे ग्रामपंचायतीच्या समोर गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ पासून सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे पदाधिकारी अण्णासाहेब सोपान दिघे व रामदास कारभारी दिघे यांनी आमरण उपोषण सूरू केले आहे.
आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.जर ४६ वर्षात भोजापूर चारीचे कामे झालीत तर मग हे भोजापुर पुराचारीचे पाणी तळेगाव भागातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पर्यंत का पोहोचले नाही.असा सवाल यावेळी आंदोलकर्त्यानी उपस्थित केला आहे.काही ठिकाणी तरी हि चारी अदृश्य स्वरूपात दिसत असल्याचा देखील आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.भोजापूर पूर चारी चोरीला गेली का काय असा सवाल यानिमित्ताने बोलताना आंदोलनकर्त्यानी उपस्थित केला.सदर उपोषणासाठी तळेगाव दिघे येथील साहेबराव दिघे,मच्छिंद्र घुले,विकास दिघे,उत्तम दिघे,राजू लामखडे,दिलीप कदम,मधुकर दिघे,तुकाराम दिघे अमोल दिघे,वसंत दिघे,मयुर दिघे, दत्तू दिघे,कैलास दिघे,आर.पी.दिघे,सुनील दिघे,मनोज दिघे,गुंजाळ मेजर,अशोक दिघे,गोरख बढे,निलेश दिघे,राजेश दिघे,महेश दिघे,सुनील दिघे,पप्पू कदम रावसाहेब दिघे,अमोल दिघे,सोपान दिघे,दिलीप दिघे,गोविंद दिघे,रावसाहेब जानेकर,
यांसह आणि ग्रामस्थांनी उपोषणाची पाठिंबा दर्शवला आहे.जोपर्यंत संबंधित ठेकेदरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.