शिर्डीतील मोदींच्या कार्यक्रमात मित्रपक्ष रिपाईला टाळल्याचा निषेध;जिल्ह्यामध्ये भाजपाशी युती ठेवायची की नाही यावर लवकरच निर्णय घेणार-रीपाईजिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात
अहमदनगर (दि.२६ ऑक्टोबर):- गुरूवारी दि.२६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीत विविध कार्यक्रमांचे उद्घाटनासाठी येत असून मित्र पक्ष रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांना व जिल्हा संपर्कप्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांतजी भालेराव राज्य नेते विजयराव वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड,उत्तर जिल्हाअध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिणचे सुनील साळवे व जिल्हय़ातील एकाही तालुका अध्यक्षाला कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचे भाजपा कडून जाणीवपूर्वक टाळण्यात आले असून निमंत्रण पत्रिकेतून व बॅनर मधून वगळल्या मुळे रिपाई कार्यकर्त्या मधे तीव्र संताप व्यक्त केला असून त्या बाबत भाजपचा व पडद्यामागील सूत्र धारांचा जिल्हाअध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांनी व कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध केला आहे.
त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पंतप्रधान मोदी आज निळवंडे प्रकल्प देशाला समर्पित करणार असून ७५०० कोटींच्या प्रकल्पांचे उदघाटन व लोकार्पण किसान सन्मान निधीचे ऑनलाईन वितरण करण्यात येणार आहे.तसेच साईबाबा मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उदघाटन अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जल पूजन करून निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत.शिर्डी जवळील काकडी विमानतळ लगतच्या मोकळ्या मैदानात शेतकरी मेळाव्यात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी आरोग्य,रेल्वे, रस्ते गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण करून राष्ट्राला समर्पित करणार आहेत.देशामध्ये भाजप व रिपाई यांची युती असून रिपाईचे जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोठे जाळे असुन जिल्ह्यामध्ये पक्ष मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येते असून नेहमीच रिपाईचे मोठ मोठे कार्यक्रम व मेळावे होत असतात त्या कार्यक्रमांच्या निमंत्रित पत्रिकेत व बॅनरवर भाजपचे जिल्हा पासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पालकमंत्री यांचे नाव व फोटो आवर्जून टाकून युतीचा प्रामाणिक धर्म पाळताना रिपाईचे कार्यकर्ते दिसतात याउलट भाजप नेहमीच रिपाईला अपमानास्पद वागणूक देऊन रिपाईच्या नेत्याचे नाव व फोटो लावण्याची लाज वाटते की काय असा सवाल जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांनी उपस्थित केला असून आम्ही लवकरच या संदर्भात या घटनेची नोंद घेऊन जिल्ह्यामध्ये रिपाईची भाजपाशी युती ठेवायची की नाही यावर लवकरच निर्णय घेऊन ग्रामपंचायत,पंचायत समिती जिल्हापरिषद या निवडणुका स्वबळावर लावण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.