
अहमदनगर (दि.१३ नोव्हेंबर):-टेम्पोसह,रोख रकमेचा अपहार करणारा वाहनचालक आरोपीस 2,97,600/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी यशवंत सोन्याबापु धामणे (रा. कानडेमळा,सारसनगर, अहमदनगर) यांचे सारसनगर येथे न्यु शनिराज ट्रेडर्स नावाचे ऍ़ल्युमिनीअम पट्टया विक्रीचे सर होलसेल दुकान आहे.त्यांच्या दुकानातील टेम्पोचालक प्रतिक येशुदास कळकुंबे हा ऑर्डर प्रमाणे ऍ़ल्युमिनीअम पट्ट्या देण्यास जात असतो. दि.31 ऑक्टोबर रोजी टेम्पो चालक प्रतिक कळकुंबे याने ताब्यातील महिंद्रा टेम्पोत ऍ़ल्युमिनीअम पट्टया भरुन आखेगांव रोड,शेवगांव येथील शुभम ऍ़ल्युमिनीअम या दुकानात पोहच केल्या व त्यांचे कडुन त्या मालाचे 3,00,000/-रुपये रोख रक्कम घेऊन निघाला परंतु टेम्पो चालक याने मालाचे आणलेले पैसे फिर्यादी यांना देणे एैवजी टेम्पोसह फरार होवुन रकमेचा अपहार केला या तक्रारी वरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 685/2023 भादविक 406 प्रमाणे अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर यांना स्थागुशाचे पथक नेमुण गुन्ह्याचा समांतर तपास करुन,आरोपीचा शोध घेवुन मुद्देमालासह ताब्यात घेणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/ दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन आरोपीचा शोध घेवून मुद्देमालासह ताब्यात घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गुप्तबातमीदारा मार्फत माहिती घेताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली वर नमुद गुन्ह्यातील महिंद्रा टेम्पो क्र.एमएच/14/ जीडी/5436 हा राजूर परिसरात फिरत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविल्याने पथकाने लागलीच राजूर येथे जावून महिंद्रा टेम्पो चालकाचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने टेम्पोसह ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या चालकास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रतिक यशुदास कळकुंबे (रा.कानडे मळा, सारसनगर,अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील अपहार केलेली रोख रक्कम टेम्पो, अल्युमिनीअमच्या पट्टया असा एकुण 2,97,600/- रुपये किंमतीचा मुद्देमाल काढुन दिल्याने त्यास मुद्देमालासह भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ/भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/मनोहर गोसावी,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,सचिन आडबल, फुरकान शेख,पोकॉ/रणजीत जाधव,किशोर शिरसाठ व चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केलेली आहे.