
अहमदनगर (दि.३ डिसेंबर):-स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहता तालुक्यातील शिर्डी येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार अवैध धंद्याची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की साजिद साहेबखान पठाण व आबिदखान साहेबखान पठाण दोघे रा.नुरानी मज्जिद जवळ श्रीराम नगर शिर्डी ता.राहता त्यांच्या राहत्या घराच्या तळमजल्यात खोलीमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू व पानमसाला विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांना सोबत घेऊन बातमीतील ठिकाणी जाऊन छापा टाकला असता विमल पान मसाला,विमल बिग पान मसाला,केतन सुप्रीम पान मसाला,वी 1 सुगंधित तंबाखू, असा एकूण 1,27,461( एक लाख सत्तावीस हजार चारशे एकसष्ट) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोना/संदीप चव्हाण ने.स्थानिक गुन्हे यांच्या फिर्यादीवरून वरील दोन्ही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर मॅडम,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव,पोहेकॉ/मनोहर गोसावी,पोना/गणेश भिंगारदे,पोना/संदिप चव्हाण,पोकॉ/अमृत आढाव,चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केली आहे.