
अहमदनगर (दि.२ डिसेंबर):-नगर शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या आणि जिल्ह्यात प्रचंड गाजलेल्या ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातला फरार आरोपी बबलू सरोदे याच्यावर आज शनिवार (दि.२ डिसेंबर) रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला.

या हल्लेखोरांनी सरोदे या फरार आरोपीला जबर मारहाण करून जखमी अवस्थेत माळीवाडा परिसरातल्या हुच्चे याच्या हॉटेलसमोर आणून टाकला.या हल्ल्याची माहिती समजताच कोतवाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी माळीवाडा परिसरात दाखल झाले.
पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.या प्रकरणानंतर माळीवाडा परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.