Maharashtra247

जबरी चोरीतील आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद

अहमदनगर (दि.६ डिसेंबर):-जबरी चोरीतील दोन सराईत आरोपीस चोवीस तासात ९८,०००/- रु.किं. मुद्देमालासह पकडण्यात श्रीरामपुर शहर पोलीसांना यश आले आहे.

बातमीची हकीकत अशी की,दि. 01 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी नानासाहेब रंगनाथ चोंडके (धंदा-फोटोग्राफर रा.अथिती कॉलनी,वार्ड नं.1.ता. श्रीरामपुर जि.अहमदनगर) हे त्यांच्या मावसभावाचे लग्न पाचोरा जि.जळगाव येथे असल्याने तेथे लग्नासाठी गेलो होते व लग्नानंतर पाचोरा येथून रेल्वेने दि.02 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्रीचे सुमारास रेल्वे स्टेशन श्रीरामपुर येथे आले असता व येथुन घरी अथिती कॉलनी, वार्ड नं 01 येथे पायी जात असताना तहसील कार्यालयासमोर मोटारसायकलवर 02 अनोळखी इसम आले व त्यांनी मला आडवले व तु इतक्या रात्री कुठे चालला, तु चोर आहे.

त्यांना मी सांगितले की, मी चोर नाही, मी पाचोरा येथुन लग्न लावुन आलो असुन मी घरी चाललो आहे. असे सांगितले असता ते मला म्हणाले की, आम्हाला तुझ्या खिशातील पैशे दे त्यावेळी मी त्यांच्या जवळून पळुन जायला लागलो, तेव्हा त्यांनी त्यांचे कडील शाईन गाडीवर माझा पाठलाग करुन मला पकडले व मला लाथाबुक्याने मारहाण करुन माझ्या पॅन्टच्या खिश्यातील 13,000 रू. (तेरा हजार रूपये) व 11,500/-रू. किंतीचा एक रियलमी कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला.

त्यावेळी मी आरडाओरड केली असता ते दोघेही तेथून पळून गेले,वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोस्टे. गुरनं. 1282/2023 कलम 394,341,34 प्रमाणे दिनांक 03/12/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरचा गुन्हा दाखल होताच पोनि.हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ तपास पथकास बोलावुन सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक हे तात्काळ घटनास्थळी जावुन तांत्रिक विश्लेषणकरुन तसेच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती घेवुन गुन्हयातील आरोपीचा व गुन्हयात वापरलेल्या मोटारसायकलचा शोध घेत असताना सदरची मोटारसायकल व त्यावरील दोन संशयीत इमस हे श्रीरामपूर ते नेवासा जाणारे रोडवरील अशोक पेट्रोल पंपासमोर उभे असल्याचे दिसल्याने त्याचेकडे जावुन त्याना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यानी त्याचे नाव 1) खालीद बिबन शेख रा.कृष्ण विहार साईट,वार्ड नं. 01, श्रीरामपूर जि. अहमदनगर. 2) बाबर जब्बार पठाण, रा.हुसेननगर वार्ड नं.01,श्रीरामपूर जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले.

त्याच्याकडे नमुद गुन्हयाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पोलीस स्टेशन येथे आणुन त्याना विश्वासात घेवुन त्याच्याकडे सखोल तपास केला असता सदरचा गुन्हा आम्ही दोघांनी मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना तात्काळ नमुद गुन्हयात अटक केले. व त्याच्याकडुन फिर्यादी यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हर्षवर्धन गवळी, यांचे कडील गुन्हे शोध पथकातील पोसई/समाधान सोळंके,पोना/रघुवीर कारखेले,पोकॉ/राहुल नरवडे, पोकों/गौतम लगड,पोकॉ/ गणेश गावडे,पोकॉ/ रमिझराजा अत्तार,पोकॉ/ संभाजी खरात,पोकों/ आकाश वाघमारे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यलयाचे पोकों/ आकाश भैरट यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, हे करीत आहेत.

You cannot copy content of this page