Maharashtra247

संगमनेरात तब्बल ६०० किलो गोमांस जप्त स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

अहमदनगर (दि.६ डिसेंबर):-संगमनेर शहरात अवैधरीत्या गोमांस विक्री सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,तब्बल १ लाख २० हजार ५०० रुपये किमतीचे ६०० किलो गोमांस जप्त,

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवून कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार यांचे पथक नेमूण त्यांना अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत सुचना देवून पथकास रवाना केले.त्यानंतर वरील पोलीस पथक संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,बक्कर कसाब मस्जिद जवळ कसाईवाडा, संगमनेर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करुन गोमांस विक्री करीत असलेबाबत बातमी मिळाल्याने संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे सपोनि/ दाभाडे व पोलीस अंमलदार यांना मदतीकरीता घेवून बातमीतील ठिकाणी बक्कर कसाब मस्जिद जवळ कसाईवाडा,संगमनेर या ठिकाणी गेले असता जनावराची कत्तल करणारे आरोपी पोलीसांना पाहुन पळून गेले.

त्यापैकी आरोपी नामे १)शफिक महंमद कुरेशी रा.गल्ली नं.९,जमजम कॉलनी, संगमनेर, २)शेहबाज गुलफाम कुरेशी रा. मोगलपुरा,संगमनेर यांचा पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेकडे पळून गेलेल्या आरोपीबाबत विचारपुस करता पळून गेलेल्या आरोपीची नावे ३)मुजाहित उर्फ मुज्जु दौला कुरेशी, ४) हारुन सुलतान कुरेशी, ५) कलीम जलील कुरेशी, ६) शाहिद इर्शाद कुरेशी, ७) उमर शकुर कुरेशी, ८) खलील बुढन कुरेशी सर्व रा.मोगलपुरा, संगमनेर असे असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या कब्जात १,२०,०००/- रुपये किमतीचे ६०० किलो गोमांस,लोखंडी सुरा असा एकुण १,२०,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बाबत पोना/१४८७ सचिन दत्तात्रय अडबल नेम स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु. र. नं. १००१/२०२३ भादवि कलम २६९, ३४ सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५ (क) ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील कायदेशिर कारवाई संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोरमॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर,श्री.सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,पोना/सचिन अडबल, पोकॉ/आकाश काळे,मच्छिंद्र बर्डे,अमृत आढाव यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page