Maharashtra247

ढोरळा येथे भीमनगरमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाज बांधवांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन

धाराशिव/संतोष खुणे (दि.६ डिसेंबर):-आज ६ डिसेंबर म्हणजेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अभिवादन केले जाते.

 

धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातील ढोरळा येथे भीमनगर मध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी सरपंच छाया थोरात म्हणाल्या की आज समाजात जो महिलांना मान सन्मान आहे तो फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे त्यामुळे महिलांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान त्यांचे विचार न विसरता त्याचे अनुकरण केले पाहिजे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच छाया विलास थोरात,ग्रामपंचायत सदस्य प्रताप माणिक थोरात,अशोक थोरात,पांडुरंग सोनटक्के, मच्छिंद्र सोनटक्के,प्रशांत सोनटक्के,अजय सोनटक्के, साहेब गायकवाड,दीपक सोनटक्के,गणेश सोनटक्के, सचिन सोनटक्के,निखिल गायकवाड,इत्यादी उपस्थित होते.

You cannot copy content of this page