अहमदनगर (दि.६ डिसेंबर):-अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नगर तालुक्यातील पांगरमल येथे विषारी दारुकांडाचं एक सहा वर्षांपूर्वी प्रकरण घडले होतं.
यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर एक जण दिव्यांग आणि एक जण अंध झाला होता.या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून मोकाटे यांचा समावेश करण्यात आला होता.बरेच वर्षे त्या फरार होत्या.मात्र त्यानंतर सीआयडीने त्यांना अटक केली.दरम्यान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गोसावी यांनी भाग्यश्री मोकाटे यांना काही अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला.
ॲड.सतीश गुगळे यांनी या प्रकरणात मोकाटे यांच्या वतीनं काम पाहिलं.जामीन झाल्यानंतर पोलीस ठाण्यात हजेरी लावणे,तपासकामी पोलिसांना सहकार्य करणे आणि साक्षीदारांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये अशा अटी न्यायालयाने मोकाटे यांच्यावर लादल्या आहेत.ॲड.गुगळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं,की ज्यावेळी ही घटना घडली होती त्यावेळी भाग्यश्री मोकाटे यांचं वय अवघे २० वर्षे होतं.
त्यामुळे जेवण आयोजित करणारे नागरिकांशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क आला नव्हता.दरम्यान, याच प्रकरणातल्या मंगल आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे.या प्रकरणाचा तपास 2017 साली पूर्ण होऊन 2020 झाली कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं.
मात्र पुढील तपासात सीआयडीला भाग्यश्री मोकाटे यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा सबळ पुरावा मिळून आला नाही. त्यामुळे भाग्यश्री मोकाटे यांना जामीन मंजूर करावा.या सर्व बाबींचा विचार करुन न्यायालयानं मोकाटे यांना जामीन मंजूर केला.