
पारनेर प्रतिनिधी:-दि.८ डिसेंबर २०२३ रोजी पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील ढोकी गावचे शिवारातील भुसारी वस्ती परिसरात काही दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठीचे नियोजन करून रस्त्यांवरील वाटसरूंना तसेच कल्याण महामार्गावरून येणारे जाणारे वाहनांना अडवून त्यांचेवर दरोडा टाकून लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी सदर माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यांना कळवून त्यांचे सूचना व मार्गदर्शनानुसार छापा व कारवाईचे नियोजन करून कारवाईसाठी पोलीसांची पोलीसांची पाच वेगवेगळी पथके तयार करून संशयित दरोडेखोर बसलेल्या ठिकाणा सर्व बाजूंनी त्यांना वेढण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकातील पोलीसांनी स्थानिक लोकांसारखे पेहराव करून वेगवेगळ्या मार्गाने सदर दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ठिकाणी कोणासही कोणतीही भनक लागणार नाही अशा पद्धतीने नियोजनबद्धरित्या दरोडेखोर बसलेल्या टोकडीला सर्व बाजूंनी घेरून पूर्वनियोजनानुसार अचानक दरोडेखोरांवर छापा टाकला.
तेव्हा पोलीस आल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्र करून पोलीसांशी झटापट करीत असताना पोलीसांनी नियोजनबद्धरित्या 1) साईनाथ तुकाराम पवार (2) दिपक रोहिदास गायकवाड (3) सोमनाथ रामदास गायकवाड (4) अरूण बाळासाहेब बर्डे (5) बाळासाहेब उर्फ बाळू लहानू गायकवाड सर्व रा. कुरणवाडी,बारागाव नांदूर, ता. राहुरी जि.अ.नगर, (6) साईनाथ गजानन काळे रा.दहीगाव साकत,ता.जि. नगर व (7) जेरू भगवान भोसले रा.लोहगाव,ता. पैठण, जि.संभाजीनगर असे एकूण 07 दरोडेखोरांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून दोरोड्यासाठी वापरण्यात येणारी साधने,लोखंडी सुरे, सुताची दोरी,मिरचीची पूड व दोन मोटारसायकली असा 1,50,570/- रु किं.चा मुद्देमाल जप्त केला असून त्यांचे विरूद्ध पारनेर पोलीस स्टेशनला गु.र.नं. 1168/2023 भा.द.वि. क. 399,402 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,सहा.पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले,पोलीस उपनिरीक्षक मोतीराम बगाड,पोहेकॉ/संदिप गायकवाड,पोना/ गहिणीनाथ यादव,शाम गुजर, पोकॉ/सारंग वाघ,सागर धुमाळ,संपत शिंदे,गोवर्धन जवरे,विजय जाधव,मयुर तोरडमल,गणेश डोंगरे,संतोष मगर,किरण भापकर,रविंद्र पाचारणे,बाळासाहेब पालवे, देविदास अकोलकर,रवींद्र साठे,मच्छिंद्र खेमनर,विवेक दळवी व तांत्रिक व लोकेशन ची मदत दक्षिण विभागाचे मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडू,पोकॉ नितीन शिंदे,मपोकॉ ज्योती काळे यांनी केली आहे.