
अहमदनगर (दि.९ डिसेंबर):-श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील पीडित तरुणास कोर्टातील केस मागे घे व आम्हाला जामीन मिळण्यास काहीही हरकत नाही
असे सांग नाही तर जिवे ठार मारू,अशी धमकी न्यायालयाच्या आवारात यातील आरोपी नानासाहेब काशिनाथ गलांडे, कुणाल नानासाहेब गलांडे व एक अनोळखी इसम यांनी दिली.याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुणावर अत्याचार व मारहाण प्रकरणातील आरोपी न्यायालयात आलेले असताना त्यावेळी या प्रकरणातील फिर्यादी शुभम विजय माघाडे हा तारखेसाठी न्यायालयात आला असता. तिघांनी शुभम विजय माघाडे यास म्हणाले की,तू आमच्या विरुद्ध दाखल केलेली केस मागे घे व आम्हाला जामीन मिळविण्यासाठी काही हरकत नाही असे लिहून दे नाही तर तुला जिवे ठार मारू, अशी धमकी दिली.
याप्रकरणी शुभम विजय माघाडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा रजि.नं.२०७१/२०२३ प्रमाणे तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहे.