
अहमदनगर (दि.२० डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील जगप्रसिद्ध साईबाबांच्या समाधी मंदिर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी असताना रिल्स बनविण्यासाठी ड्रोन उडविणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे देव दोडीया असे आहे तो मुंबई येथील रहिवासी आहे.साई मंदिर आणि परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे;मात्र मुंबई येथील इसमाने रील बनविण्यासाठी साई मंदिर परिसरात ड्रोन उडवल्याचा प्रकार समोर येताच त्याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साई मंदिराशेजारी असलेल्या हॉटेलच्या टेरेसवरून ड्रोन उडवत या तरूणाने बनवलेले रील्स इन्स्टाग्रामवर टाकल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.काही दिवसांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानला सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने शिर्डी ग्रामस्थांना दर्शनासाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले.