
संगमनेर (दि.२१ डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा CG NEWS चे संपादक श्री.राजेंद्र मेढे यांची युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना, पोलीस मित्र महाराष्ट्र संघटनेच्या संगमनेर तालुका सदस्य पदी नुकतीच निवड झाली आहे.
संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी व संचालक तथा प्रदेशाध्यक्ष रंगनाथ मोरे यांनी मेढे यांना निवडीचे पत्र दिले आहे.पत्रकार राजेंद्र मेढे यांच्यावर चिंचोली गुरव गावात व तसेच संगमनेर तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
