
अहमदनगर (दि.२२ डिसेंबर):-अहमदनगर महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भव्यदिव्य असा लोकार्पण सोहळा गुरवार दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आला.या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सिंहासनावर बसलेल्या १८ फूट उंचीचा चबुतऱ्यावर १२ फूट उंचीचा बसविण्यात आला आहे.
यावेळी अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार सुजय विखे पाटील व नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे उपस्थित होते.महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी पहिल्यांदा सन २०१७-२०१८ मध्ये ठराव झाला होता.
नंतरच्या काळात याचा नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा केला होता.भविष्यात येणार्या आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी छत्रपती शिवरायांचा मनपातील हा पुतळा प्रेरणादायी व आदर्श ठरणार आहे,अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली.छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकर्पण झाले असले तरी,छत्रपती संभाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यांचे कामेही अंतिम टप्प्यात आले आहेत.असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ,जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे,आयुक्त डॉ. पंकज जावळे,रणरागिणी महिला मंचच्या धनश्री विखे पाटील,उपमहापौर गणेश कवडे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर,अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे,सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे,नगरसेवक सुनील त्र्यंबके,सभापती पुष्पाताई बोरूडे,नगरसेविका मीनाताई चोपडा,नगरसेविका रूपाली वारे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी केले.तर सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे यांनी शेवटी आभार मानले.खूप दिसांपासून प्रतीक्षा करणारे नगरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाने आनंदित झाले.