
अहमदनगर (दि.२३ डिसेंबर):-निंबळक येथुन महिलेच्या गळयातील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करून त्याच्याकडून सुमारे दोन लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.

दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी घटनेतील फिर्यादी नामे दत्तात्रय सोजीबा मुठे (रा.निंबळक ता.जि. अहमदनगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ०३.३० वा चे सुमारास निंबळक ते निमगाव घाणा रोड दत्तमंदिराजवळ फिर्यादी व त्यांची सुन पूजा व नात असे त्यांच्या मोटर सायकलवरुन जात असताना त्यांचे पाठीमागुन पल्सर मोटार सायकलवरुन दोन अज्ञात इसम यांनी येऊन फिर्यादी यांची सुन पुजा हिचे गळयातील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण बळजबरीने काढुन घेऊन चोरी करुन फिर्यादी हे चालवत असलेल्या मोटार सायकलला लाथ मारुन त्यांना खाली पाडुले व भरधाव वेगाने पळुन गेले आहे.
या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नंबर ११६२/२०२३ भादविक ३९४,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा समांतर तपास करत असताना सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, गुन्हा हा आरोपी नामे १)अक्षय सुरेश कुलथे, रा.राहुरी ता.जि.अहमदनगर २) गणेश शेटे,रा.राहुरी ता.जि.अहमदनगर (नजरेआड) (पुर्ण नाव माहित नाही) यांनी मिळुन केला आहे.ते सध्या पढेगाव ता. श्रीरामपुर येथे आहेत. त्यानुसार सपोनि/राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना पढेगाव येथे पाठवीले.पोलीस पथकांनी पडेगाव येथून आरोपीला सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. सदर आरोपीने गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचे कडे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हस्तगत केले असुन आरोपीनी गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल जप्त केली आहे.
तसेच त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल आहे.सदरचे आरोपी आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग श्री.संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप-प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई/चांगदेव हंडाळ,पोहेकॉ/नंदकिशोर सांगळे,पोहेकॉ/राजु सुद्रीक, पोहेकॉ/अनिल आव्हाड,पोना/विष्णु भागवत, पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/गजानन गायकवाड,पोकॉ/नवनाथ दहिफळे,दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंडु यांनी केली आहे,