
पारनेर प्रतिनिधी (दि.२३ डिसेंबर):-नाताळ सुट्टीमध्ये पारनेर तालुक्यातील गोरेगाव व गोरेगाव परिसरातील इंग्रजी,सेमी,मराठी माध्यमातील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यासाठी युनिक चाईड व एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी तर्फे १३ वर्ष शिकवण्याचा अनुभव असलेले शिक्षक ॲड.प्रविण तांबे सर यांचे कडून फ्री अबॅकस शिकवले जाणार आहे.

या सेमिनार मध्ये १ ते ९९ पर्यंत हाताच्या बोटावर मोजणे.भरभर बेरीज वजाबाकी करणे.९९ पर्यंत बेरीज वजाबाकी हाताच्या बोटावर मोजणे ते पण काही सेकंदातच हे करता येणार आहे.अबॅकस मुळे कॅल्क्युलेटर,कॉपी किंवा पेनशिवाय गणिताचे प्रश्न सोडवू शकतात.जी भीती तुम्हाला गणिताचा अभ्यास करण्यापासून रोखत होती ती कायमची नाहीशी होते. यासोबतच गणितात रस वाढतो.लक्ष केंद्रित करण्याची आणि ऐकण्याची क्षमता वाढते.स्मरणशक्ती आणि मानसिक क्रियाकलाप सुधारते हे नंतरच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देखील खूप उपयुक्त आहे.
सेमिनारची तारीख व वेळ
दि.24 डिसेंबर वेळ – सायंकाळी 4 ते 6 वाजता,25 व 26 डिसेंबर वेळ सकाळी 9 ते 11व सायकाळी 4 ते 6 या वेळेत गोरेगांव.एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी,ST स्टॅण्ड वर,नविन पोस्ट ऑफिस समोर (जुनी मराठी शाळा) गोरेगांव या ठिकाणी होणार आहे.हा कोर्स पुर्णपणे मोफत असून त्यासाठी कुठलीही फी घेतली जाणार नाही.या फ्री सेमिनारचा फायदा घ्या.असे आवाहन ॲड.तांबे सर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क📳8600297224