
अहमदनगर (दि.२३ डिसेंबर):-जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये मोफत नेत्ररोग तपासणी तसेच अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे नेत्ररोग तपासणी शिबिर रविवार दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत आनंदऋषीजी नेत्रालय, महावीर भवन येथे होणार आहे.या शिबिरात लहान मुलांच्या तिरळेपणावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
या शिबिरात नेत्रपटल (रेटिना) तपासणी,काचबिंदू निदान व उपचार मार्गदर्शन, फेको पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर विशेष सवलत, सर्व डायग्नोस्टिक टेस्टवर तसेच चष्मा खरेदीवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्स-रे २५० रूपये, सोनोग्राफी कलर प्रिंट व रिपोर्टसह ७५० रूपये, सिटीस्कॅन १२५० रूपये, एमआरआर २५०० रूपयांत उपलब्ध असून चोवीस तास आनंदऋषीजी ब्लड बँक सुविधा उपलब्ध आहे.महावीर भवन येथे अल्पदरात निवास व्यवस्था आणि फक्त ३५ रूपयांत भोजन सुविधा उपलब्ध आहे.
शिबिरांचा रूग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जैन सोशल फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.या शिबिरात नाव नोंदणीसाठी ८६८६४०१५१५ या मोबाईल नंबरवर संपर्क करावा.