
श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.२२ डिसेंबर):-श्रीगोंदा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकाकडून दोन वेठबिगार इसमांची मुक्तता करण्यात आली

असून बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुरन 674 /23 भादविक 367,370 वेठबिगारी अधिनियम कलम 16 अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास करताना दालखुश मुकिंदा काळे या अटक आरोपीकडून त्याने लपवून ठेवलेला अजून एक वेठबिगार (नाव तुफान वय 30 अंदाजे,शारीरिक व मानसिक कुचंबना झाल्याने पूर्ण नाव गाव सांगता येत नाही) यास मुक्त करण्यात आले.
कोळगाव वाघदरा शिवार येथून आरोपी नामे विशाल उपरलाल काळे याचे ताब्यातून इसम नामे शिवाजी (वय अंदाजे ३५ वर्षे, शारीरिक व मानसिक कुचंबना झाल्याने पूर्ण नाव गाव सांगता येत नाही) याची सुटका केली त्यावेळी आरोपी विशाल उपरलाल काळे लगतच्या लिबुंनीच्या शेतात पळून गेला.या बाबत गुरन 674 /23 भादविक 367,370 वेठबिगारी अधिनियम कलम 16 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बेलवंडी पोहेकॉ/नंदू पठारे करत आहे.
बेलवंडी पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एकूण १९ वेठबिगार मुक्त केले आहे.व १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,पोहेकॉ/नंदू पठारे, अजिनाथ खेडकर,मपोना/ सुरेखा वलवे,पोकॉ/कैलास शिपणकर,रामदास भांडवलकर,विनोद पवार,सतीश शिंदे,संदीप दिवटे जावेद शेख यांनी केली आहे.
यावेळी बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना केले हे अवाहन
बेलवंडी पोलीस स्टेशन द्वारे सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या आजूबाजूला अशाप्रकारे अनोळखी इसमांना आणून त्यांच्यावर अत्याचार करून,अर्धवट उपाशी ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने विविध कामे करून घेतली जात असल्यास/ भीक मागितली जात असल्यास सदर माहिती पोलिसांना पुरवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.