अहमदनगर (दि.२४ डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीचा भाजप नगरसेवक हितेश कुंभार खंडणी प्रकरणात कोनगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी बायपास रस्त्यावरील एका बिअरबार चालकाकडून डान्सबार आणि सर्व्हिसबार सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी आठ लाख रुपये आणि त्यानंतर प्रतिमहिना 25 हजार रुपये देण्याची मागणी त्याने केली होती.
आपण मुंबई भाजपचे नगरसेवक असून मागीतलेली रक्कम न दिल्यास बार बंद करण्याची धमकी त्याने दिली होती. संबंधित बारचालकाने कोनगाव पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर नगरसेवकासह त्याच्या दोन साथीदारांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
हि कारवाई शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी पहाटे करण्यात आली.प्रकरणी लैलाबारचे चालक संतोष बबन भोईर ( रा.घोडबंदर रोड,ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांवरही भारतीय दंडसंहितेच्या कलम 384, 386, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे,सध्या तिघेही पोलीस कोठडीत आहेत.