
अहमदनगर (दि.१४ जानेवारी):-सारसनगर व कापूरवाडी गावठी हातभट्टी अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी 2 ठिकाणी छापे टाकून केलेल्या कारवाईत एकूण 35,000 हजार रु.किमतीचे गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन नष्ट करून एक महिला व एक पुरुष यांच्या विरोधात पोहेकॉ/दिपक प्रकाश शिंदे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल केला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,शहर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेवननाथ दहिफळे,पोहेकॉ/दिपक शिंदे,पोहेकॉ/संदीप घोडके,पोकॉ/अमोल आव्हाड ,मपोकॉ/तेजस्विनी साळवे,पोहेकॉ/बारगजे,थोरात,बी.एम.लगड यांनी केली आहे.