
अहमदनगर (दि.१४ जानेवारी):-नगर तालुक्यातील नेप्ती शिवारात गावठी हातभट्टी अड्ड्यावर दि.14 जानेवारी रोजी 4 ठिकाणी छापे टाकून नगर तालुका पोलिसांनी एकूण 2 लाख 10,000 हजार रु.किमतीचे गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन नष्ट केले.
या कारवाईत एक पुरुष व तीन महिला एकूण 4 आरोपी विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करत आहेत.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिकुमार देशमुख,पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण,विक्रांत भालसिंग,विशाल टकले,संभाजी बोराडे यांनी केली आहे.