
अहमदनगर (दि.१४ जानेवारी):-जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने महाराष्ट्रात राज्यात विक्रीस बंदी असलेला व पक्षी व प्राणी व मानवी जिवितास इजा करणारा नायलॉन चायना मांज्या विक्री करणा-या इसमां विरुध्द कारवाई करण्यासाठी आदेश दिल्याने,

तोफखाना पोलिसांनी 3 ठिकाणी कारवाई करत 94 हजार 400/-रु.चा.मुद्देमाल व एक्सेस मोपेड गाडी जप्त केली आहे.
ही कारवाई दि.14 जानेवारी रोजी पोलिसांनी केली आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग हरिष खेडकर,तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि.सचिन रणशेवरे, पोहेकॉ/दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाठ,अहमद इनामदार, दिनेश मोरे,भानुदास खेडकर,संदिप धामणे,वसिम पठाण,सुमित गवळी,सतिष त्रिभुवन,शिरिष तरटे,दत्तात्रय कोतकर,सतिष भवर यांनी केली केली आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे नागरिकांना आव्हान
नागरिकांनी नायलॉन मांज्याचा वापर करु नये त्यामुळे मानवी जिवितास तसेच पक्षांना, प्राण्यांना तिव्र इजा होण्याची दाट शक्यात आहे. तसेच अशा प्रकारच्या मांजाचा वापर केल्यामुळे गंभीर स्वरुपाचा अपघात घडुन मानवी जिवितास हानी पोहचु शकते त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर करु नये.तसेच कोठे नायलॉन मांज्याची विक्री होत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आव्हान केलेले आहे.