
अहमदनगर (दि.१४ जानेवारी):-महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला व पक्षी,प्राणी व मानवी जिवितास इजा करणारा प्लास्टीक,नायलॉनचा चायना मांजा विक्री करणाऱ्या इसमांविरुध्द जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना पथक तयार करून कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
दिलेल्या आदेशान्वये पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे एक विशेष पथक नेमून खात्री करुन कारवाईकरणे बाबत मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.पथकाने नगर व श्रीरामपूर शहरात पेट्रोलिंग फिरुन प्लास्टीक किंवा नायलॉन चायना मांजा विक्री करणारे इसमांची माहिती घेवून 2 इसमां विरुध्द कारवाई करुन त्यांचे कब्जातून मोनोकाईट,मोनो फायटर,हिरो प्लस असे वेगवेगळ्या कंपनीचा २७ हजार २०० रुपये किंमतीचा २७ नग नायलॉन मांजा जप्त केला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,अपर पोलिस अधीक्षक श्रीमती.स्वाती भोर मॅडम श्रीरामपूर विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग हरीष खेडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ/राजेंद्र वाघ,पोहेकॉ/मनोहर गोसावी, विशाल दळवी,लक्ष्मण खोकले,गणेश भिंगारदे,ज्ञानेश्वर शिंदे,पोना/रविंद्र कर्डीले,संदीप दरंदले,पोकॉ/ रविंद्र घुंगासे,सागर ससाणे यांनी केली आहे.