
अहमदनगर (दि.१५ जानेवारी):-मकर संक्रातीच्या निमित्ताने तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने हद्दीत गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन सपकाळ चौक येथे इसम नामे 1)अमोल गोपीनाथ गायकवाड रा.गऊखेल ता.आष्टी जिल्हा बीड हल्ली रा.तपोवन रोड अहमदनगर 2)रोहीत रमेश औटे रा.पिंपरखेड ता.आष्टी जिल्हा बीड सध्या पोखर्डी ता. जिल्हा अहमदनगर 3) विकास सदाशिव दिवटे रा. गाडेकर चौक,निर्मल नगर हे तिघे दारुचे नशेत हातात कोयते घेऊन फिरत होते.
गुन्हे शोध पथकाने त्यांना पकडून त्यांचे कडून एकुण 25,000/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यामधे दोन कोयते व एक मोपेड वाहन जप्त केले आहे.तोफखाना पोस्टे येथे आर्म ऍ़क्ट कलम 4/25 व मोवा.कायदा कलम 184, 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहेकॉ/गिरीगोसावी हे करत आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. हरीष खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पो/ सुनिल शिरसाट,पोहेकॉ/दिनेश मोरे,पोहेकॉ/भानुदास खेडकर,पोना/संदिप धामणे, पोना/वसीम पठाण,पोहेकॉ/ अहमद इनामदार,पोहेकॉ/ सुधीर खाडे,पोकॉ/सतीष त्रिभुवन,पोकॉ/दत्तात्रय कोतकर,पोकॉ/शिरीष तरटे , पोकॉ/सुमीत गवळी,सतीष भवर,बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.