
अहमदनगर (दि.१५ जानेवारी):-अहमदनगर शहर पुन्हा हादरले असून,भावाला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून एका युवकाने दुसऱ्या युवकावर चाॅपरने सपासप वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना एमआयडीसीतील दूध डेअरी चौकात मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी घडली आहे.
शुभम अशोक सोनवणे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.