
अहमदनगर (दि.६ फेब्रुवारी):-संत शिरोमणी गुरु रविदास महाराजाची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा चर्मकार संघर्ष समितीचा नवा पायंडा,२४ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती आहे.रविवारी या संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे होते.
जयंती निमित्ताने प्रबोधनकार भारुड सम्राट हमीद भाई सय्यद यांच्या भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यावेळी चर्मकार संघर्ष समितीच्या भिंगार शहराध्यक्षपदी भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक रामकिसन साळवे आणि सचिवपदी सेवानिवृत्त सेल्सटॅक्स ऑफिसर विठ्ठलराव जयकर यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच केडगाव उपनगराध्यक्षपदी भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक मा. आश्रुजी लोकरे यांची नियुक्ती करण्यात आली.या सगळ्यांना शिवाजीराव साळवे आणि जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी मुख्य संघटक दिलीपजी शेंडे,उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे मेजर मुख्य सल्लागार नंदकुमारजी गायकवाड,युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खरात,सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जगताप ,जिल्हा कार्याध्यक्ष रोहिदास उदमले,भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक लक्ष्मण साळे,संतोषराव त्रिंबके,दर्शन गायकवाड,तसेच महिला जिल्हाध्यक्ष सौ.मीनाताई गायकवाड,महिला शहराध्यक्षा सौ. शशिकलाताई झरेकर,सौ.संगीताताई साळवे,निवृत्त शिक्षिका सौ. मंगलताई लोकरे, इत्यादी उपस्थित होते.