Maharashtra247

जिल्ह्यातुन 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेला आरोपी जेरबंद कोतवाली पोलिसांची कारवाई

अहमदनगर (दि.१४ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातुन 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेला आरोपीस कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद,दि.13 फेब्रुवारी 2024 सायंकाळच्या सुमारास कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना भिंगार पोलीस स्टेशन हद्दपार प्रस्ताव क्र.25/2023 मधील हद्दपार इसम नामे सर्फराज मोहम्मद इब्राहीम सय्यद उर्फ सरफराज जहागिरदार हा जुनी महानगरपालीका इमारत येथे आलेला असलेबाबत खात्री लायक बातमी मिळाली.

पो.नि.दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोउपनिरी प्रविण पाटील व अंमलदार यांना सदर ठिकाणी जावुन नमुद हद्दपार इसमास ताब्यात घेवुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.कोतवाली पोलीस शासकीय वाहनाने जुनी महानगर पालीका इमारत येथे गेले असता त्यांना हद्दपार इसम सर्फराज मोहम्मद इब्राहीम सय्यद उर्फ सरफराज जहागिरदार (रा. मुकुंदनगर,अहमदनगर) हा मिळुन आला.

त्यास ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यात घेवुन येवून त्याचे हद्दपार बाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाणे, येथुन खात्री केली असता,श्री. सुधीर पाटील उपविभागीय दंडाधिकारी,नगर भाग यांचे कार्यालयीन आदेश क्र. हद्दपार प्रस्ताव क्र. 25/2023 मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1) (अ) (ब) अन्वये दि. 18/09/2023 रोजीचे आदेशान्वये सर्फराज मोहम्मद इब्राहीम सय्यद उर्फ सरफराज जहागिरदार यास एकुण दोन वर्षा करीता अहमदनगर जिल्ह्याचे स्थलसिमेच्या हद्दीतुन हद्दपार केल्याचे आदेशाची प्रत भिंगार पोलीस ठाणे येथुन प्राप्त झाली.

त्याने शहरात येण्याची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. नमुद हद्दपार इसम हा शासनाचे आदेशाचा भंग करुन हद्दपार कालावधीत अहमदनगर जिल्ह्याचे स्थलसिमेच्या हद्दीत मिळुन आल्याने त्याचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर गुन्हा रजि. नं. 167/2024 भादंवि क. 188 सह महा.पो.का.कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोउपनिरीक्षक प्रविण पाटील,पोहेकॉ/तनवीर शेख,चा.पो.हे.कॉ.सतिष भांड,पोहेकॉ/संदिप पितळे, पोकॉ/दिपक रोहकले,पोकॉ/तान्हाजी पवार,पोकॉ/सत्यजित शिंदे,पोकॉ/सुरज कदम यांनी केली आहे.

You cannot copy content of this page