संगमनेर (राजेंद्र मेढे):-संगमनेर शहर पोलीस स्टेशन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते.त्यातच आज शहरात एका अज्ञात इसमाचा विचित्र असा खून करण्यात आला असून मृतदेहाची अजून ओळख पटलेली नसून आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
नाशिक पुणे हायवे वरील पुलाखाली हॉटेल ऋतुजा जवळील महानोटीच्या ओढ्यात एका इसमाच्या तोंडावर व गुप्तांगावर ज्वलनशील पदार्थ टाकून खून करण्यात आला.हि घटना मंगळवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली असून या घटनेबाबत पोलीस पाटील श्री.गणेश मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुरन ११०/२०२४ भादवीक ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत. कोणाच्या घरातील,शेजारी,परप्रांतीय 55 ते 60 वयोगटातील व्यक्ती मिसिंग असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन माहिती द्यावी.असे आवाहन पोलिसांनी केले आहे.