Maharashtra247

तीन वर्षापासून बलात्कार व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी संगमनेर येथून जेरबंद उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग पथकाची कामगिरी

अहमदनगर (दि.१३ फेब्रुवारी) तीन वर्षापासून बलात्कार ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस जेरबंद करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या पथकाला नुकतेच यश आले आहे.

दि.०५/०८/२०२१ रोजी पारनेर पोलीस स्टेशन गुरनं. ५६२/२०२१ भादंवि कलम ३७६,४१७,३२३,५०४,५०६ सह अ.जा.ज.अ.प्र. का. क. ३९)(w)(Gi), ३(२)१v-a) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.या गुन्द्यात आरोपी कलीम उर्फ सोनु महेबुब शेख हा गुन्हा दाखल झाले पासुन फरार होता.या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संपतराव भोसले यांनी त्यांचे कडील श्रेणी.पोसई/शिवाजीढवळे,पोहेकॉ/रविकिरण सोनटक्के,पोकॉ/निखिल मुरुमकर व पोकॉ/सचिन वीर यांचे पथक तयार करुन तपासाबाबत सुचना दिल्या होत्या.

त्यावरुन वरील पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनीय तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे सदरचा आरोपी हा संगमनेर शहरात राहत असल्या बाबतची खात्रीशीर माहिती प्राप्त केली.त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने संगमनेर शहरात जावुन तेथील नेमणुकीचे पोकॉ/रोहिदास शिरसाठ यांना मदतीस घेऊन आरोपी राहत असलेल्या परिसरात सापळा रचुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले.हि कारवाई जिल्हा पोलिस पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संपतराव भोसले यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली नगर ग्रामीण विभाग कार्यालयातील पथकाने केली.

You cannot copy content of this page