
अहमदनगर (दि.१३ फेब्रुवारी):-उपचारासाठी क्लिनिक मध्ये आलेल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली आहे.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून डॉ.अंगद खाडे ( रा.विळद तालुका नगर) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.हा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ.खाडे हे रविवारी दुपारी क्लिनिक मध्ये असताना अल्पवयीन मुलीवर उपचार करण्याचा बहाना करून त्याने इच्छे विरुद्ध वारंवार अत्याचार केला हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.