
अहमदनगर (दि.१३ फेब्रुवारी):-एक सायंकाळ दिव्यांगां सोबत भव्य दिव्यांग स्नेह मेळावा अहमदनगर मध्ये सावेडी उपनगरात बंधन लॉन येथे आयोजित केला आहे.
प्रसिद्ध सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत व्हेलेंटाईन डे निमित्त साई द्वारका सेवा ट्रस्ट,सावली दिव्यांग संघटना,हेल्प मी इंडियाच्या वतीने दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी भव्य दिव्यांग मेळाव्याचे आयोजन सावेडी येथील बंधन लॉन येथे सायं ०६ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी म्यूजिकशो,मिकीमाउस, जम्पिंगपॅ्ड,बाइक रेसिंग,कार रेसिंग व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात येणार आहे.तरी नगर शहरातील व जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या स्नेहमेळाव्यात सहभागी होऊन आनंद घ्यावा.असे आवाहन साईद्वारका सेवा ट्रस्टचे संस्थापक ॲड.धनंजय कृष्णा जाधव यांनी व सावली दिव्यांगचे बाबासाहेब महापुरे यांनी केले आहे.या कार्यक्रमास नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील व नगर शहराचे आमदार संग्राम जगताप,भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर व विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.