अहमदनगर (दि.१६ फेब्रुवारी):-एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत नागापूर,एमआयडीसी येथील तीन अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई करून १२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
६२ लिटर गावठी हातभट्टी दारू व मटक्याचा अड्ड्यांवर छापा टाकत तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदारांनी केली आहे.नव्याने रुजू झालेले सपोनी/माणिक चौधरी यांनी हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई केल्याने अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे.हद्दीतील अवैध धंद्यांचा नायनाट करनार असल्याचे सपोनी/चौधरी यांनी यावेळी सांगितले.