संगमनेर (नितीन भालेराव):-राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत संगमनेर तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा येथील माघ पौर्णिमा यात्रा उत्सवास शुक्रवार दि.23/2/2024 पासुन प्रारंभ होत आहे.
संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रा उत्सव श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा येथे भरतो.त्या संदर्भात नियोजन व विचार विनिमय करण्यासाठी हनुमान मंदिर या ठिकाणी श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या वतीने सर्वसाधरण सभा आयोजित करण्यात आली होती.सभेमध्ये सर्व हजर विश्वस्त व ग्रामस्थांनी यात्रेचे नियोजन केले व ग्रामस्थांच्या आग्रहास्तव मागील वर्षीप्रमाणे यात्रा कमिटी स्थापन करण्यात आली.
श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा येथील माघ पौर्णिमा यात्रा उत्सवास यात्रा कमिटी अध्यक्ष श्री.मच्छिंद्र विश्वनाथ गडाख,उपाध्यक्ष सोमनाथ गीताराम भालेराव,उपाध्यक्ष गणेश बबनराव पावसे,उपाध्यक्ष नवनाथ लहानु पावसे,सचिव संतोष कुंडलिक पावसे, सचिव कैलास भानुदास गडाख,यांची सर्वसाधरण बैठकीत निवड करण्यात आली.सर्व ग्रामस्थ खंडोबा भाविकांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने उपस्थितांचे यावेळी आभार मानण्यात आले.