Maharashtra247

शिव पाणंद शेतरस्त्यांसाठी तहसील कार्यालयांसमोर चले जाव आंदोलन सुरू;अन्नदात्यावर उपोषणाची वेळ येते यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय-शरद पवळे महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते

पारनेर (प्रतिनिधी)-महसुल प्रशासनाचा निषेधासह जोरदार घोषणाबाजी करत पारनेरसह जिल्हाभरातील तहसील कार्यालयांसमोर आमरण उपोषण व चले जाव आंदोलन सुरू करत शेतकऱ्यांनी शेवटच्या शेतकऱ्याला शेतीला रस्ता मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे जाहीर करत आरपारची लढाई सुरू करत निष्क्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे.

दिवसेंदिवस शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी,नांगरणी,पेरणी, मशागततीसह शेतीसाठी दळवळणासाठी लागणारी यंत्रसामुग्री, शेतकऱ्यांचे दुग्धव्यवसाय,मत्स्यपालन,कुक्कुटपालन,शेळीपालन , गोपालन आदी शेती पुरक व्यवसायांसाठी शेतकऱ्यांचे शेतात वाढते वास्तव्य त्यातच सर्पदंश,विज पडणे,पुर येणे आग लागणे आदी नैसर्गिक आपत्तीच्या घटना,शेतमाल बाजारपेठेत पोहचवण्यासह शालेय विद्यार्थ्यांचा रोजचा दळवळणचा प्रश्न शेतरस्त्यांच्या अभावी गंभीर झाला असुन अनेक ब्रिटिशकालीन शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित होत्या परंतु त्यांच कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण प्रशासकीय पातळीवरून होत नाही.

अनेक वहिवाटीच्या रस्त्यांच्या नोंदी होत नाही त्याचबरोबर वडिलोपार्जित शेतीतील शेतरस्त्यांचा प्रश्न आपापसात सुटणे मुश्किल झाले असुन अनेक फौजदारी स्वरूपाच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पिढीजात तंटे उभे निर्माण होण्याची भिती निर्माण झाली असुन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अर्ज बनवण्यापासून ते प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष जीवनाचा भाग बनला असुन यातुन पुढच्या पिढीच मोठ नुकसान होताना दिसत आहे.

त्यातच सरकार जाहिरातींवर मोठा खर्च करत आहे प्रत्यक्ष शासन निर्णयाची अंमलबजावनी होत नाही त्यामुळे झोपलेल्या प्रशासणाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतकयांनी पारनेरसह जिल्हाभरातील तहसील कार्यालयांसमोर आमरण उपोषण व चले जाव आंदोलन सुरू केले यावेळी पारनेरमध्ये गावागावातील शेतरस्त्यांसाठी तहसीलवर अनेक शेतकरी हजर झाले जिल्हाधिकाऱ्यांनी शेतरस्त्यांसाठी सप्तपदीसह महाराजस्व अभियान जिल्हयात राबवले परंतु तहसील कार्यालयांकडून शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करत ही अभियाने कागदावरच राहिली आहेत.

दिवसेंदिवस तहसील कार्यालयांवर शेतरस्ता केसेस वाढत चालल्या असुन तहसील प्रशासन ढिम्म आहे त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून पुन्हा तातडीने पारदर्शक महाराजस्व अभियान राबवावे,ग्रामशेतरस्ता सामित्यांची स्थापना करावी, शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करून नबऱ्यांचे सर्वेक्षण करत नंबरी हटवणाऱ्यांना दंड सुरू करावेत, तहसीलवर शुन्य रस्ता केसेस ठेवाण्यात त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या महाराजस्व अभियानाची अंमलबजावनी न करणाऱ्या जिल्हयातील तहसीलदारांसह शेतरस्त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबीत करावे सदर मागण्या १४ फ्रेबुवारी पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे १५ फेबुवारीपासून जिल्हाभर विविध तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयासमोर शेतकरी आमरण उपोषण धरणे धरत चले जाव आंदोलनाचा नारा देत न्यासासाठी प्रशासणाला जाब विचारात आहेत यावेळी रामदास लोणकर, भाऊसाहेब वाळूंज,बबन मावळे, संजय साबळे, बबन गुंड आदी शेतकरी आमरण उपोषण चालु केले असुन तालुक्यातील शेतकरी गुलाबराव नवले, विजय दळवी, गजाबा घोगरे, दशरथ वाळूंज, कारभारी बढे,अंकूश शेटे, सखाराम भोसले, भानुदास बनकर, हरिभाऊ भांड, गेणू कावरे, दत्ता दाते, रमेश बारकर, नितिन परंडवाल, संदिप घोलप, शंकर खैरे, विश्वनाथ गुंजाळ, विश्वनाथ खुटाळ, पोपट गुंड , नितिन गुंड आदींनी धरणे आंदोलन सुरू केले असून सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलकांचे मनोबल वाढवत पाठींबा दर्शवला यावेळी शेतकऱ्यांनी आरपारची लढाई सुरू करत जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय घेतला असे महाराष्ट्र शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page