अहमदनगर (दि.१५ फेब्रुवारी):-तोफखाना पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी गांजा पिण्या-या दोन इसमांवर कारवाई केली असून जुन्या आरटीओ कार्यालयाच्या मागे हे इसम गांजा पित असले बाबत तोफखाना पोनि/श्री.आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहीतीवरुन तोफखाना पोलीसांनी कारवाई करुन दोन इसमा विरुध्द एनडीपीएस कायदा 8 (क), 27 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच दुसऱ्या कारवाईत कॉलेजच्या मुलांना अश्लील चाळे करणे करीता जागा उपलब्ध करुन देणारे कॅफेंनवर तोफखाना पोलिसांनी धडक कारवाई करत दिल्लीगेट परीसरात कॅफेचे नावावर कंम्पार्टमेंट करुन,पडदे लावुन अंधार करून शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती पोनि.श्री.आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहीतीवरुन तोफखाना पोलीसांनी येथेही कारवाई करुन महा पोलीस अधि 1951 प्रमाणे 129, 131(कक) प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली तोफखाना पो.नि.श्री.आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार उपनिरी/ सचिन रणशेवरे,पोहेकॉ/ दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट,पोहेकॉ/दिनेश मोरे,पोहेकॉ/भानुदास खेडकर,पोहेकॉ/अहमद इनामदार,पोहेकॉ/सुधीर खाडे,पोना/पोना संदिप धामणे,पोना/वसीम पठाण, पोना/सुरज वाबळे,पोकॉ/ सतीष त्रिभुवन,पोकॉ/दत्तात्रय कोतकर/पोकॉ/शिरीष तरटे, पोकॉ/सुमीत गवळी यांनी केली आहे.