अहमदनगर (दि.२३ फेब्रुवारी):-नगर शहराच्या अत्यंत जवळ असणाऱ्या एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौकात संदीप उर्फ बाळू शेळके (रा.गजानन कॉलनी) या इसमाचा अज्ञात व्यक्तीनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी रोजी घडली आहे.
एका कंपनीच्या बंद पडलेल्या प्लॉटमध्ये असलेल्या रूममध्ये हा सापडला मृतदेह सापडला आहे.परंतु नेमकी ही हत्या कोणत्या कारणासाठी केली आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्यासह पोलिस अंमलदार घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती सपोनि/चौधरी यांनी दिली.