केडगाव मध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद;वनविभाग व कोतवाली पोलिसांची संयुक्त मोहीमेला यश
अहमदनगर (दि.२४ प्रतिनिधी):-नगर शहरातील केडगाव येथील शाहूनगर परिसरात दुपारच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच मोठी खळबळ उडाली होती.एका नागरिकावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले होते.
नागरिकांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ दखल घेत त्या ठिकाणी धाव घेतली.पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते.नागरिकांकडून माहिती मिळताच वनविभागाची एक टीम घटनास्थळी पोहोचली.पोलिसांनी बघ्यांची गर्दी पांगवत तेथील परिसर रिकामा केला.
त्यानंतर वनविभाचं बचाव दल घटनास्थळी पोहोचलं आहे.अखेर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांची एक टीम व वन विभागाचे कर्मचारी यांनी संयुक्त मोहीम राबवून अखेर बिबट्यास ७ तासाने जेरबंद केले.