Maharashtra247

दुचाकी चालकाला मारहाण करुन जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद एलसीबीची कामगिरी

अहमदनगर (दि.२४ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात व परिसरामध्ये मोटारसायकल चालकास मारहाण करुन जबरी चोरी करणारे २ आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

बातमीची हकीगत अशी की,दि.03 फेब्रुवारी रोजी सतिष शंकर पुरम (रा.स्वामी समर्थ नगर,शिर्डी,ता.राहाता, जि.अहमदनगर) हे व त्यांचा मुलगा साईसुशांत हे दोघे त्यांचे जनरल स्टोअर्स दुकान बंद करुन मोटारसायकलवरून घरी जात असतांना शिर्डी ते साकुरी शिवरोडवर त्यांना विना नंबरचे काळे रंगाचे मोटारसायकलवर आलेल्या 03 आरोपींनी अडवुन फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चैन,रोख रक्कम व मोबाईल असा एकुण 1,55,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता.या घटनेबाबत राहाता पोलीस स्टेशन गु.र.नं. 64/2024 भादवि कलम 394, 323, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.या गुन्ह्यामध्ये प्रमोद हरी लोखंडे रा.पिंपळस ता.राहाता,जि.अहमदनगर यास अटक करण्यात आलेली होती.परंतु त्याचे इतर दोन साथीदार मिळुन आलेले नव्हते.

सदर पाहिजे आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शोध घेत असतांना आरोपी हे सुपा एम.आय.डी.सी.परिसरामध्ये आलेले असल्याची माहिती मिळाल्याने सुपा एम.आय.डी.सी.परिसरामध्ये जावुन गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असतांना दोन संशयीत इसम मिळुन आले.सदर संशयीत इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) प्रविण उर्फ पचास नानासाहेब वाघमारे रा. पिंपळस,ता.राहाता,जि. अहमदनगर, 2) सचिन कल्याणराव गिधे रा. समर्थनगर,कन्नड,ता.कन्नड, जि.छ.संभाजीनगर असे असल्याचे सांगितले.सदर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना राहाता पोलीस स्टेशन गु.र.नं. 64/2024 भादवि कलम 64/2024 भादवि कलम 394, 323, 34 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहाता पोलीस स्टेशन करीत आहे.

हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे, श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर,पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,बापुसाहेब फोलाणे,रविंद्र कर्डीले,संतोष लोढे,संदीप चव्हाण,फुरकान शेख,संतोष खैरे,प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ,अरुण मोरे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page