Maharashtra247

देवटाकळी येथील कलाबाई शामराव कर्डिले यांचे निधन

अहमदनगर (दि.१२ मार्च):-शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील कलाबाई शामराव कर्डिले यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धापकाळामुळे शुक्रवार दि.०८ मार्च २०२४ रोजी १.०५ वा.दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवास त्यांचे चिरंजीव आबासाहेब शामराव कर्डिले यांनी अग्नी दिला.यावेळी देवटाकळी येथील व परिसरातील व जिल्हा पोलीस दलातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या पश्चात देवटाकळी येथील प्रगतशील शेतकरी श्री.आबासाहेब शामराव कर्डिले (मुलगा) सौ. विजया शहाजी भोसले (मुलगी) यांच्या त्या आई होत्या व जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र आबासाहेब कर्डिले नातु व सौ.विद्या विलास काटे संभाजी नगर,सौ.वैशाली संतोष शेळके बहिरवाडी नेवासा,सौ.जयश्री प्रवीण घुंगार्डे अहमदनगर यांच्या त्या आजी होत्या.

त्यांचा दशक्रियाविधी रविवार दि.१७ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. रामेश्वर मंदिर कायगांव टोके (प्रवरासंगम) श्री क्षेत्र त्रिविणेश्वर देवस्थान हंडीनिमगांव ह.भ.प. रमेशनंदगिरीजी महाराज यांचे कीर्तन होईल.व तेरावा बुधवार २० मार्च २०२४ रोजी रहात्या घरी होईल.

You cannot copy content of this page