अहमदनगर (दि.६ ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.यात नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील उज्जैनी माता माध्यमिक विद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अज्ञात इसमाने तोंड बांधून गच्चीवर नेले.
व तेथे गेल्यावर त्यांनी तिचे हात व पाय बांधून टाकले.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना सोमवार ५ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० वा. सुमारास घडली आहे.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी केले अवाहन
याबाबतचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याखाली वेगवेगळी टॅगलाईन करून अफवा पसविल्या जात आहे.त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये,अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत
