अहमदनगर (दि.६ ऑगस्ट):-सामाजिक कार्यकर्ते स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे यांना वंचित, निराधारांसाठी नि:स्वार्थ भावनेने करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल इन्फ्लुन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मुंबईत प्रदान करण्यात आला.

मुंबईतील एका सभागृहात झालेल्या समारंभात हा पुरस्कार डॉ.उद्धव शिंदे यांनी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा,चीफ एडिटर, महिमा जैन,चीफ एडिटर जयेश भट्ट,मिनाक्षी छभैय्या यांच्या हस्ते स्वीकारला.पदक,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,ओळखपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
डॉ.उद्धव शिंदे हे स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब व गरजू व्यक्तींना मदतीचा हात देत सामाजिक कार्य करत आहे,तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन, दिव्यांगसाठी मदत, गरजू शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक समाजोपयोगी कार्य करत आहेत.ही कौतुकास्पद बाब आहे,असे यावेळी आयोजकांनी सांगितले.
