सोलापूर प्रतिनिधी:-श्रावण महिना पवित्र व व्रत वैकल्याचा मानला जातो तसेच विविध सणानिमित्य आणखी ही उत्सुकता वाढते.
त्यातल्या त्यात नागपंचमी हा मुलींचा व महिला वर्गाचा आवडता सण आदल्या दिवशी उपवास करुन भगवान शंकराचे लाडके वासुकी अर्थात नागदेवताचे पुजन उपवास करुन भावाला व कुटुंबाला सौख्य मागणा-या माता भगिनींचा हा सण शृंगाराशिवाय अपुर्णच जिथे प्रत्येक घराघरात मेंहेंदी कोन,बांगडी,टिकली,नेलपेंट,मोतीची माळ,हेअरबँड पिना, काजळ,हात रुमाल,हयांच्या समावेश असतोच,परंतु आजही समाजात असे काही महिला वर्ग आहेत ज्यांना यापासुन वंचित राहाव लागत आहे.
या महिलांसाठी आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात त्यात हा एक जिव्हाळ्याचा नियोजन सण नागपंचमी सोलापुरातील बेघर निवारा केंद्र व मंगलदृष्टी निराधार महिला आश्रम,क्रांती महिला संघ एचआयव्ही संघटना व अनाथ मुलींना,तसेच स्मशान काम करणारे महिलांना,कुष्ठरोग पिडीत महिलांकरिता शृंगार किट वाटप करण्यात आले.त्यात मेहेंदी कोन,नेलपेंट,टिकली,माळ,क्लच,बांगडी,काजळ,हात रुमाल,आदिंचा समावेश होता.
तसेच यावेळी मिठाई वाटप करण्यात आली.एक आगळेवेगळे नियोजन करण्यात यश एकाच वेळी सोलापुरातील ६ वेगवेगळ्या ठिकाणी शृंगारकिट वाटप तसेच बार्शीतल्या एचआयव्ही पिडीत महिला ज्यांनी देहविक्री करून उदरनिर्वाहसाठी केलेल्या पिडितांसाठी तसेच सात रस्त्यावरिल वृध्दाश्रमातील ज्येष्ठ महिलांना शृंगार किट व मिठाई वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे नियोजन श्री.विजय छंचुरे यांनी केले तर महिला सभासदांनी त्यास उस्फुर्त प्रतिसाद दिला.यावेळी आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँकेचे टीम नीलिमा हिरेमठ,छाया गंगणे,स्नेहा वनकुद्रे,कांचन हिरेमठ,स्नेहा मेहता, विद्या माने,नीता अकुर्डे,संगीता छंचुरे,अनिता तालीकोटी,कल्पना कांबोज,सुरेखा पाटील, सुवर्णा पाटील,मंगल पांढरे,ज्योत्स्ना सोलापूरकर,रेणुका जाधव,संपदा जोशी, पुष्कर पुकाळे,अविनाश माचरला,विजय छंचुरे या सर्वांच्या उपस्थितीत नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्यात आला.बेघर या ठिकाणी नागपंचमीनिमित्त सणानिमित्त महिलांना त्यांचे आवडते अलंकार यावेळी वाटप करण्यात आले. सोलापुरात कुठलीही जात-भेद न मानता आस्था रोटी बँक नेहमी गोरगरीब गरजू लोकांना मदतीचे हात पुढे करत असते.असे आस्था रोटी बँकच्या सदस्य नीता आकुर्डे यांनी सांगितले.
