Maharashtra247

आनंदऋषी हॉस्पीटल नेत्रालयाचे प्रशासकाला  मनपा आयुक्तांनी बजावली नोटीस;सतर्क नागरिकांमुळे वाचले दोघा खाजगी सफाई कर्मचाऱ्यांचे प्राण

 

अहमदनगर (दि.२३ ऑगस्ट):-आनंदऋषी हॉस्पिटल नेत्रालयाचे प्रशासक श्री.आनंद छाजेड यांनी दि.२३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी त्यांच्या पी.टी.चेंबर साफ करणे कामी खाजगी कर्मचारी नामे १)श्री.जयसिंग शिंदे व २)श्री.विशाल साठे यांना सफाईचे काम करण्यास सांगितले असता सदर कर्मचारी यांनी महानगरपालिकाचे सार्वजनिक रस्त्यावरील मेन होल विनापरवाना उघडून त्यामध्ये उतरून काम करत असतांना ते मृश्चित होवून मेन होल मध्ये अडकले होते.

सदर बाब हि आसपासच्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यंनी सदर घडलेली गंभीर बाब स्थानिक मा.उपमहापौर व मनपाचे कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून दिली.सदर दोन्ही खाजगी कर्मचा-यांचे नागरिकांनी काही विघटीत घटना होण्या अगोदर त्यांना दोरीच्या सहाय्याने वर काढले.वास्तविक पाहता हॉस्पीटलचे प्रशासक यांनी प्रत्यक्ष थांबून काम करून घ्यायला पाहिजे होते.नागरिक व मनपाचे कर्मचारी यांनी सदर कर्मचा-यांना तात्काळ विध्नहर्ता हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यामुळे त्यांचेवर त्वरित उपचार करता आले.

हि बाब मनपाचे आयुक्त तथा प्रशासक यांना माहिती झाली असता त्यांनी त्वरित संबंधीत आनंदऋषी हॉस्पीटल (नेत्रालय) चे प्रशासक श्री.आनंद छाजेड यांना फौजदारी गुन्हा दाखल का करू नये? ची नोटीस बजावली आहे.मनपाच्या पूर्व परवानगी शिवाय अशा प्रकारचे कोणतेही काम खाजगी कर्मचाऱ्यांमार्फत करू नये व मनपाची बदनामी होवू देवू नये.असे मनपाचे आयुक्त तथा प्रशासक श्री.यशवंत डांगे यांनी म्हंटले आहे.

You cannot copy content of this page