Maharashtra247

संविधान सन्मान महामेळावा २ सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात होणार…!

 

नगर प्रतिनिधी:-नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधी इंडिया आघाडीने एन डी ए सरकार संविधान बदलणार असा अपप्रचार केला तो केवळ जनतेस दिशाभूल करणारा स्टंट होता त्यामुळे संविधानाच्या सन्मानार्थ नगर शहरात जिल्हा व्यापी संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले होते.

परंतु काही अपरिहार्य कारणाने हा मेळावा २ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदनगर शहरातील सहकार सभागृह या ठिकाणी दुपारी ४ वाजता होणार असल्याची माहिती महामेळाव्याचे स्वागताध्यक्ष सुरेश  बनसोडे तसेच निमंत्रक सुमेध गायकवाड व अजय साळवे यांनी दिली आहे.

या संविधान सन्मान महामेळाव्यात  नामदार रामदासजी आठवले यांची सलग तिसऱ्यांदा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार तसेच नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र  शिवाजीराव गर्जे व अमितजी गोरखे यांची विधानपरिषदेच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर, क्रीडामंत्री नामदार संजय बनसोडे,जयदीपभाई कवाडे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शहराचे लोकप्रिय आमदार संग्रामभैया जगताप हे असणार आहेत त्यामुळे या मेळाव्याला जास्तीत जास्त फुले शाहू आंबेडकर व साठे चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून भीमशक्तीचे विराट दर्शन घडवावे असे आव्हान जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव,विजयराव वाकचौरे,प्रा.जयंत गायकवाड, सुनील साळवे,किरण दाभाडे, नितीन कसबेकर,संपतराव भारुड, राजाभाऊ कापसे,सुरेंद्र थोरात, गौतमीताई भिंगारदिवे,विजयराव भांबळ,दिपकराव गायकवाड, झेव्हिअर भिंगारदिवे,मा.नगरसेवक राहुल कांबळे,जयाताई गायकवाड, भिमा बागुल,विनोद भिंगारदिवे, महेश भोसले,यांनी केले आहे.

You cannot copy content of this page