धक्कादायक…मारहाणीत सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
अहमदनगर प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.यात राहुरी खुर्द येथील शनिशिंगणापूर फाट्यावर ता.२२ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मायलेेकाच्या मारहाणीत सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सुखदेव किसनराव गर्जे (अकोला,ता.पाथर्डी,जि. अहमदनगर)असे मृत झालेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याचे नाव आहे.मयत सुखदेव गर्जे यांना एका महिला आणि तिच्या मुलाने मारहाण केली.या मारहाणीत गर्जे हे खाली पडले.त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.पण वैद्यकीय अधिकार्यानी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक महिला व तिच्या मुलाला ताब्यात घेतले.पुढील कारवाई पोलिस करत आहे.