मयत बेवारस पुरुषाच्या नातेवाईकांचा शोध होण्यासाठी तोफखाना पोलिसांनी केले अवाहन
अहमदनगर (दि.२२ ऑगस्ट):-सिव्हिल हॉस्पिटल येथील सि.एस.ऑफिस समोर विषारी औषध घेतल्याने एका इसमास सिव्हील मधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याला औषधोपचारासाठी कॅज्युलटी येथे दाखल केले होते.
परंतु सदरील इसम हा दि.२० ऑगस्ट रोजी उपचार चालू असताना मयत झाला.मयत झालेल्या इसमाचे नातेवाईक किंवा ओळखीचे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
या मयत इसमाची ओळख पटवावी म्हणून तोफखाना पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध व्हावा म्हणून या नंबरशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
पोहेकॉ.व्ही.सी.गंगावणे मो.9552521584,0241-2416118