जिल्ह्यात बालस्नेही पोलीस स्टेशन कार्यान्वित करावे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
अहमदनगर (दि.२२ ऑगस्ट):-महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे अहमदनगर दौऱ्यावर असतांना त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली.यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला.
लहान मुलांसाठी बालस्नेही पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे,यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन समितीमधून करावा अशा सूचना त्यांनी केल्या.डॉ.गोऱ्हे यांनी त्यांच्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत देखील सहमती दर्शवली.
यासंदर्भात पोलिसांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.अहमदनगर जिल्ह्यात भरोसा सेल कार्यान्वित असल्याची माहिती श्री.ओला यांनी दिली.अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील त्याचा उपयोग व्हावा यादृष्टीने आठवड्यातील ठराविक दिवस ऑनलाईन पद्धतीने तालुकास्तरीय नियोजन करण्याच्या सूचना यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.
नवीन दंडसहिंतेसंदर्भात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षण व जागृती करण्यात यावी,अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केली.