भेंडा प्रतिनिधी:-जिजामाता ज्युनिअर कॉलेज भेंडा येथे वृक्ष लागवड करून त्या वृक्षांना जाळी लावून त्या वृक्षाचे योग्यरित्या संगोपन व्हावे हा मुख्य हेतू पूर्णत्वास यावा म्हणून डाॅ.हरिष वाघमारे यांनी कॉलेजला वृक्ष संवर्धन जाळी भेट देऊन वृक्षांना लावली.

यावेळी उपस्थित डाॅ.हरिष वाघमारे, प्राचार्य भारत वाबळे, प्रा.सुधाकर नवथर, प्रा.संतोष सोनवणे , संदेश वाघमारे,प्रा.सौ. सविता नवले,प्रा.सौ. उषा मिसाळ,प्रा.सौ. ज्योती बाचकर, प्रा.सौ.निकम प्रा.सौ.मुंगसे,आदि प्राध्यापक-प्राध्यापिका उपस्थित होते.उपस्थितांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले.
निसर्गात अमूल्य शक्ती असते.निसर्गाची सेवा करण्यातच खरा आनंद असतो.देण्याने वाढत असते.असे प्रतिपादन डाॅ. हरिष वाघमारे यांनी केले.
रक्षाबंधन सोबतच वृक्षाबंधन..! एक अनोखा उपक्रम
रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपल्या भावाला राखी बांधतो. त्याच प्रमाणे आपण वृक्षाला देखील राखी बांधावी,हि संकल्पना देखील राबविण्यात यावी.कारण वृक्ष आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असतात.असे डाॅ.हरिष वाघमारे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
